मुंबईवरील हल्ल्यामागील सूत्रधार हाफीझ सईद याच्यासह एकाच व्यासपीठावर बसणारा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासिन मलिक याची चौकशी करून, त्याच्यावर खटला दाखल करण्यात यावा तसेच, त्याचे पारपत्रही (पासपोर्ट) जप्त करण्यात यावे, अशी मागणी दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष एम.एस.बिट्टा यांनी केली.
आपल्या ‘चळवळी’ला गती मिळावी यासाठी मलिक अफझल गुरूच्या फाशीचे राजकारण करीत आहे, असा आरोपही बिट्टा यांनी केला. लष्कर ए तोयबाचा अतिरेकी हाफीझ सईद याच्यासह व्यासपीठावर बसणे हा देशद्रोह आहे आणि या गुन्ह्य़ाबद्दल मलिक याच्यावर तातडीने खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा