कमी कबरेदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, अल्झायमर व कर्करोगाचे काही प्रकार हे आजार रोखण्यासाठी त्यामुळे नवीन औषधे तयार करता येऊ शकतात.
बिटा हायड्रॉक्सिब्युटायरेट (बिटा-ओएचबी) या संयुगाची भूमिका वैज्ञानिकांनी तपासली असून ते आपल्या शरीरातील एक केटोन आहे. त्याची निर्मिती प्रदीर्घ काळ कमी उष्मांकाचा आहार किंवा केटोजेनिक आहारामुळे या संयुगाची निर्मिती मानवी शरीरात होत असते. केटोन गटातील संयुगे ही काही वेळा अतिमात्रेत असतील तर विषारीही सिद्ध होत असतात ती टाइप १ मधुमेह असलेल्या रुग्णाच्या शरीरात ती आढळतात. ऑक्सिडीकरणामुळे येणारा ताण हा काही रेणू विषारी पातळीपर्यंत वाढल्याने निर्माण होतो, त्यामुळे वार्धक्याची क्रिया वाढत जाते. बिटा-ओएचबी हा शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत काही विकरांना रोखतो जी ऑक्सिडेशनमुळे ताण निर्माण करीत असतात. ताण रोखल्याने यात पेशींपासूनच वार्धक्याची क्रिया रोखली जाते. पेशी जेव्हा ऊर्जेसाठी ऑक्सिजन वापरतात तेव्हा ऑक्सिडीकरणाने ताण येतो व परिमाम शरीरात विषारी रेणू सोडले जातात त्यांनाच आपण फ्री रॅडिकल्स किंवा मुक्तकण असे म्हणतो. पेशी वार्धक्याकडे झुकतात तसे मुक्तकणांची निर्मिती रोखण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. पेशी खराब होतात. ऑक्सिडेशनमुळे ताण वाढतो व वार्धक्य आणखी वेगाने तुमचा पाठलाग करते. बिटा-ओएचबीमुळे या प्रक्रियेला अटकाव होतो. वैज्ञानिकांच्या मते बिटा-ओएचबी निर्मितीमुळे हिस्टोन डिअ‍ॅसेटिलाइजेस किंवा एचडीएसी या वितंचकाचे कार्य रोखले जाते. एचडीएसीमुळे फॉक्सो ३ ए व एमटी २ या जनुकांची जोडी स्वीच ऑफ केली जाते पण बिटा-ओएचबीमुळे एचडीएसीला तसे करण्यापासून रोखले जाते परिणामी ही दोन्ही जनुके कार्यान्वित राहतात त्याचा परिणाम म्हणून पेशी ऑक्सिडेशनने निर्माण होणाऱ्या चाणाला रोखण्याची प्रक्रिया सुरू करतात. 

Story img Loader