तुर्कस्थानच्या राजधानीत असलेल्या अमेरिकी दूतावासाच्या प्रवेशद्वाराजवळ एका आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या  बॉम्बस्फोटात दोन जण ठार झाले. मृतांमध्ये दूतावासाच्या सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. दूतावासाच्या प्रवेशदाराजवळील सुरक्षा चौकीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर शुक्रवारी मृतदेह आढळून आले. हे मृतदेह सुरक्षारक्षकांचे असल्याचे येथील एका खासगी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली नसून दूतावासात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याचे समजते.

Story img Loader