अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी आपल्या खोलीत बॉम्ब बनवत असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी झालेल्या स्फोटात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. मुख्य आरोपीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. विद्यापीठात घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना बुधवारी सायंकाळी घडली. अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेणारा एक विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत कथितपणे बॉम्ब बनवत होता. यावेळी त्याच्या हातात स्फोट झाल्याने तो गंभीर जखमी झाला, असं पोलिसांनी सांगितलं. संबंधित विद्यार्थी हा बॉम्ब का बनवत होता? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप कळू शकली नाही.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

हेही वाचा- रेल्वेच्या दुहेरी बॉम्बस्फोटांचा ‘तो’ क्षण, ज्वाळांजवळ उभे लोक.. व्हायरल Video ची खरी बाजू जाणून व्हाल थक्क

प्रभात यादव असं आरोपी विद्यार्थ्याचं नाव असून तो अलाहाबाद विद्यापीठात एमएचं शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी तो पीसी बॅनर्जी वसतिगृहातील त्याच्या खोलीत बॉम्ब बनवत होता. यावेळी स्फोट झाला आणि त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती शिवकुटीचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश कुमार यादव यांनी दिली.

हेही वाचा- १० लाख डॉलर बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा…; मुंबई विमानतळाला धमकीचा ई-मेल

या घटनेनंतर आरोपीला गंभीर अवस्थेत एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत आणखी एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी आरोपी प्रभात यादवविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही एसीपींनी सांगितलं.