बांगलादेशच्या दौऱयावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राहात असलेल्या हॉटेलबाहेर सोमवारी दुपारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटात कोणीही जखमी झालेले नाही. घरगुती बनावटीच्या क्रुड बॉम्बचा हा स्फोट होता.
दुपारी दोनच्या सुमारास सोनारगाव पॅन-पॅसिफिक हॉटेलबाहेर हा स्फोट झाला. दोन व्यक्ती मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी टोपीमधून गुंडाळून आणलेला बॉम्बचा सार्क कारंज्याजवळ स्फोट घडवून आणला. घटनास्थळापासून ५० मीटरवर राष्ट्रपती राहात असलेले हॉटेल आहे. मोटारसायकलवरून आलेले दोन्ही व्यक्ती पळाले असल्याचे आणि त्यांचा शोध सुरू असल्याचे तेजगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अपूर्वा हसन यांनी सांगितले.
दरम्यान, या स्फोटानंतर हॉटेलभोवती असलेली सुरक्षाव्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे. स्फोट झाला त्यावेळी राष्ट्रपती हॉटेलमध्ये होते की नाही, हे समजलेले नाही.

Story img Loader