गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या तालिबानी बंडखोरांच्या कारवायांनी रविवारी पुन्हा एकदा उचल खाल्ली. तालिबानी बंडखोरांनी थेट जलालाबाद विमानतळालाच लक्ष्य केले. मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला नाटो सैनिकांनी सुरुंग लावला. या धुमश्चक्रीत तीन अफगाण सुरक्षारक्षक व दोन सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले तर काही नाटो सैनिक जखमी झाले.पाकिस्तानी सीमारेषेनजीक असलेल्या जलालाबाद विमानतळावर आत्मघातकी हल्ला करून विमानतळच ताब्यात घेण्याचा तालिबानी बंडखोरांचा इरादा होता. बंडखोरांनी प्रथमत विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी कारबॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर घमासान गोळीबार करत विमानतळ परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नाटो सैनिकांनी तालिबान्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.    

Story img Loader