पाकिस्तानचे माजी लष्करशाह व माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या फार्म हाऊसच्या बाहेर स्फोटकांच्या पाच पिशव्या सापडल्या आहेत. न्यायालयात जात असताना त्यांच्या मार्गावर स्फोटके ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही स्फोटके सापडली आहेत.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चक शहजाद फार्म हाऊस या त्यांच्या पार्क रोडवरील निवासस्थानाजवळ ही स्फोटके सापडली असून, त्यात ४००-५०० ग्रॅम स्फोटक पदार्थ होते. २४ डिसेंबर रोजी त्यांच्या न्यायालयाकडे जाण्याच्या मार्गावरही स्फोटके सापडली होती.   मुशर्रफ यांच्यावर २००७ मध्ये राज्यघटना निलंबित करून काही न्यायाधीशांची धरपकड केल्याप्रकरणी राजद्रोहाचा आरोप असून, त्यांच्यावर खटला सुरू आहे. त्यांच्या वकिलाने सांगितले, की मुशर्रफ यांच्या जिवाला धोका असून, त्यामुळे न्यायालयातील सुनावणीला उपस्थित राहू शकत नाहीत.  
दरम्यान, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने लगेच घटनास्थळी येऊन ब्रीफकेसमध्ये असलेले बॉम्ब निकामी केले. मुशर्रफ हे आता १ जानेवारीला न्यायालयात उपस्थित होणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा