पीटीआय, नवी दिल्ली

भारत व कॅनडा यांचे संबंध सध्या कठीण टप्प्यातून जात असल्याचे मत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी व्यक्त केले. कॅनडाच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांकडून भारताच्या कारभारात होणाऱ्या हस्तक्षेपाबाबतच्या चिंतेमुळे दोन्ही देशांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत समानता आणण्याची तरतूद अमलात आणली गेली, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ‘कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेत प्रगती झाल्याचे आम्हाला दिसल्यास कॅनडियन नागरिकांना व्हिसा जारी करणे आम्ही पुन्हा सुरू करू शकतो’, असे एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर म्हणाले.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Canada Khalistani
Canada : कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराचा कार्यक्रम रद्द; खलिस्तानी धमकीमुळे हिंसाचाराची भीती
Hardeep Singh Nijjar aide Arsh Dala Arrested
भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला कॅनडात अटक; खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा निकटवर्तीय अर्श डल्ला कोण आहे?
justin trudeau accepts Khalistani supporters in Canada
Canadian PM Justin Trudeau: सर्वच हिंदू मोदी समर्थक नाहीत, कॅनडाच्या पंतप्रधानांची टीका; म्हणाले “आमच्याकडे खलिस्तानी…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
justin treudeau s jaushankar canada india
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली म्हणून कॅनडानं वृत्तसंस्थेलाच केलं ब्लॉक; आगळिकीवर भारताची तीव्र नाराजी!

 कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आल्याबद्दल विचारले असता, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संख्येत समानता आणण्याची तरतूद  व्हिएन्ना करारात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कॅनडाचे राजनैतिक कर्मचारी आमच्या कारभारात सतत हस्तक्षेप करत असल्याबाबतच्या चिंतेमुळे आम्ही हे समानतेचे पाऊल उचलले, असे जयशंकर म्हणाले.भारताची ही कृती कायद्याशी विसंगत असल्याचे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलनी जोली यांनी म्हटले होते, त्याचा या स्पष्टीकरणाला संदर्भ होता. कॅनडाने भारतातून ४१ कर्मचाऱ्यांना माघारी बोलावले आहे.

हेही वाचा >>>तेलंगणा विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, KCR यांच्याविरोधात BRS च्या माजी नेत्याला उमेदवारी; तीन खासदारही रिंगणात

मध्यपूर्वेतील घडामोडींचा प्रभाव अस्पष्ट नाही

संघर्ष आणि दहशतवाद यांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो, याचे यापुढे समर्थन करता येऊ शकत नाही, असे जयशंकर म्हणाले. दिल्लीतील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात जयशंकर यांनी जगातील भूराजकीय उलथापालथीच्या अभ्यासाचा आढावा घेतला. सध्या पश्चिम आशियात जे काही घडत आहे, त्याचा प्रभाव अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही असे ते म्हणाले.