मॉस्को : जगातील सध्याची स्थिती अशांत असूनही रशियाचे भारत आणि तेथील नागरिकांबरोबरचे संबंध प्रगतीपथावर आहेत. भारतातील पुढील सार्वत्रिक निवडणुकांनंतर ‘कोणतीही राजकीय समीकरणे’ उदयास आली तरी दोन्ही देश आपले पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवतील, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी क्रेमलिन येथे पुतिन यांची भेट घेतली तेव्हा पुतिन यांनी ही टिप्पणी केली.
युक्रेनवर रशियाची लष्करी कारवाई सुरू असतानाही भारत आणि भारत यांच्यातील संबंध रशिया मजबूत आहे. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही आणि हे संकट मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवले जावे, असे म्हटले आहे.
‘‘आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सामर्थ्य माहीत आहे आणि आम्ही युक्रेनमधील परिस्थिती, तेथील तणाव आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेशी संबंध याविषयी नियमितपणे बोललो आहोत.’’ असेही पुतीन म्हणाले.
हेही वाचा >>> अयोध्येतील रेल्वे स्थानकानंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, टर्मिनल इमारतीला श्रीराम मंदिराचं रुप
‘‘मी त्यांना अनेकदा संघर्षांच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. या समस्येचे शांततेने निराकरण करण्यासाठी सर्वकाही करण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल मला माहिती आहे, आम्ही आता याबद्दल सविस्तर चर्चा करू, असेही पुतिन म्हणाले.
‘आमचे मित्र’ पंतप्रधान मोदी रशियाला भेट देतील तेव्हा आनंद होईल. सध्याच्या समस्या आणि रशिया -भारत संबंधांच्या विकासासाठी चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळेल. आम्हाला विविध विषयांवर चर्चा करायची आहे, असेही पुतीन म्हणाले.
‘‘तुम्ही (परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर) माझ्या शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांना द्या. तसेच कृपया त्यांना आमचे निमंत्रण द्या, आम्ही भेटीसाठी उत्सुक आहोत, असे त्यांनी जयशंकर यांना सांगितले. जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने पुतीन यांना वैयक्तिक शुभेच्छा दिल्या आणि पुतीन यांना एक पत्र देखील दिले.
अनेक पाश्चात्य देशांच्या आक्षेपानंतरही भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढली आहे. जयशंकर यांनी पुतीन यांना सांगितले की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प पुढे नेण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात मंगळवारी करार झाल्याची माहितीही त्यांनी दिली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह, उपपंतप्रधान आणि व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील आंतरसरकारी रशियन-भारतीय आयोगाच्या रशियन बाजूचे अध्यक्ष डेनिस मँतुरोव्ह आणि राष्ट्रपतींचे सहाय्यक युरी उशाकोव्ह हे देखील या बैठकीला उपस्थित होते.