ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस

काय म्हणाले एस. जयशंकर?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशताील संबंधाच्या केंद्रस्थानी दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे नाकारता येणार नाही. ही एक मुलभूत समस्या आहे. याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक देशांने आपल्या आर्थिक समस्यांवर मात करणं आवश्यक आहे. मात्र, ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही. असा देश कधीच समृद्ध होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया एस. जयशंकर यांनी दिली.

शेजारी देश आर्थिक अडचणीत सापडणं, कोणाच्याही हिताचं नाही

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज डबघाईला आली आहे. शेजारी देश अशाप्रकारे आर्थिक अडचणीत सापडणं. कोणात्यांही देशाच्या हिताचं नसतं. एखादा देश जेव्हा गंभीर आर्थिक संकटात सापडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कठोर राजकीय आणि धोरणात्मक निर्णय ध्यावे लागतात. मुळात पाकिस्तानच्या दुर्देशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार आहे. असंही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याबाबात बोलताना, यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी देशातील जनभावनांचा विचार करणं आवश्यक आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा – China Earthquake : टर्कीनंतर आता चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के; तीव्रता ६.८ रिश्टर स्केल

पुण्यात आशिया आर्थिक संवाद परिषदेचं आयोजन

पुण्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान परराष्ट्र मंत्रालयावतीने आशिया आर्थिक संवाद परिषदेच्या सातव्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, काल उद्धघाटन कार्यक्रमाला एस. जयशंकर यांच्यासह भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामगे शेरिंग आणि मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीरदेखील उपस्थित होते. या परिषदेची थीम ‘आशिया आणि जागतिक व्यवस्था’ अशी आहे.