दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व देशांनी एकसमान आणि ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. राजकीय मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन या जागतिक समस्येचा सामना करावा, असे आवाहन त्यांनी इतर देशांना केले आहे. ‘नो मनी फॉर टेरर’ या परिषदेत जयशंकर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत जोडो यात्रेमध्ये हे काय घडलं? शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहताना वाजले फटाके, राहुल गांधी संतापले

“जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा आम्ही कधीही यात तडजोड करणार नाही, हा प्रश्न नजरेआड करणार नाही. न्यायासाठीचा आमचा आग्रहदेखील आम्हीही कधीही सोडणार नाही”, ही भारताची भूमिका या परिषदेत परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केली. राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये हा धोका वाढल्याचे जयशंकर यावेळी म्हणाले. कायद्याची अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणेपेक्षा तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादी अधिक सहजतेने करत असल्याने या समस्येला खतपाणी मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.

“मी समलैंगिक असल्यानेच…” ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल यांचा मोदी सरकारवर मोठा आरोप

“दहशतवाद हा दहशतवादच असून या समस्येला राजकीय पातळीवर समर्थन दिलं जाऊ शकत नाही. दहशतवादाविरुद्धची लढाई सर्व आघाड्यांवर, सर्व परिस्थितीत आणि सर्व ठिकाणी ठामपणे लढली गेली पाहिजे”, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.दहशतवादामुळे जागतिक सुरक्षा आणि स्थैर्याला निर्माण झालेल्या धोक्याबाबत समविचारी भागीदारांसोबत काम करण्यास भारत कटीबद्ध असल्याचे जयशंकर या परिषदेत म्हणाले.

मंगळुरूत ऑटोमध्ये स्फोट झाल्याने खळबळ, चालकासह प्रवासी जखमी; पोलिसांकडून तपास सुरू

या परिषदेदरम्यान जयशंकर यांनी मालदीवचे गृहमंत्री इम्रान अब्दुल्ला यांचीही भेट घेतली. दरम्यान, ‘दहशतवादी कायद्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका’ या विषयावर एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेत सुरक्षा परिषदेकडून येत्या १५ डिसेंबरला बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: External affairs minister s jaishankar took a stong stand against terrorism in no money for terror conference rvs