भारत-पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला रविवारी बॅंकॉकमध्ये सुरुवात झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री मंगळवारी पाकिस्तानला रवाना होणार आहेत. अफगाणिस्तान संदर्भातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या पाकिस्तानला रवाना होणार आहेत.
बॅंकॉकमध्ये झालेल्या चर्चेवेळी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिवदेखील उपस्थित होते. बैठकीसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, उभय प्रतिनिधींनी विविध मुद्द्यांवर चर्चा करीत दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यावर तसेच पॅरिस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान झालेल्या अनौपचारिक चर्चेची फलनिष्पत्ती म्हणूनच या बैठकीकडे पाहिले जात आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला सुरुवात झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाण्याचे निश्चित केले आहे. अफगाणिस्तान संदर्भातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन त्या भूमिका मांडणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा