Shashi Tharoor : काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि खासदार शशी थरुर ( Shashi Tharoor ) बागेत पेपर वाचत बसले असताना एका माकडाशी अनोख्या पद्धतीने भेट झाली. ही घटना बुधवारी (४ डिसेंबर) घडली. शशी थरुर यांनी एक्सवर फोटो शेअर करून माहिती दिली आहे. आपल्याला एक वेगळा अनुभव आल्याचं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. शशी थरुर ( Shashi Tharoor) हे काँग्रेसचे एक अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांना भेटायला माकड आलं. ते त्यांच्या मांडीवर विसावलं आणि माकडाने चक्क डुलकीही काढली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस नेते शशी थरुर हे इंग्रजी शब्दसंग्रहामुळे चर्चेत असतात

काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजी भाषेच्या शब्दसंग्रहामुळे नेहमीच चर्चेत असतात, पण बुधवारी त्यांना त्यांच्या घरी एका माकडाबरोबर असा एक अनुभव आला की तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. शशी थरूर आपल्या दिल्लीतील निवासस्थानी खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत असताना एक माकड तेथे आले आणि त्यांच्या छातीला चिकटले. यावेळी शशी थरूर यांनी माकडाला खाऊ घालण्यासाठी केळीही दिली, त्यानंतर ते छातीवर डोकं टेकवून झोपलं.

हे पण वाचा- IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव

शशी थरुर यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

तुम्हाला हनुमानाने आशीर्वाद दिला आहे असं दिसतंय असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. मी फोटो झूम केले आणि हे जाणून घेतलं की शशी थरुर नेमका कुठला पेपर वाचत आहे असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. शशी थरुर यांनी असंही म्हटलं आहे की हे माकड मला चावेल का? आणि त्यानंतर मला रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागेल का? थोडी काळजी वाटली होती, पण नंतर या माकडाने काहीही केलं नाही. उलट ते माझ्या मांडीवर शांतपणे झोपी गेलं. असंही शशी थरुर यांनी म्हटलंं आहे. तसंच वन्यप्राण्यांचा आम्ही आदर करतो असंही थरुर यांनी म्हटलं आहे.

काही तासांतच या पोस्टला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. एका युजरने लिहिले की, हे आमचे पूर्वज आहेत सर. तर आणखी एका युजरने गंमतीशीप कमेंट करत म्हटले की, त्याला कदाचित तुमच्याकडून इंग्रजी शिकायचे असेल. आणखी एका युजरने थरूर ( Shashi Tharoor) आणि माकडाचा फोटो शेअर करत लिहिले की, शब्दांशिवाय प्रेम व्यक्त केले जाऊ शकते. या पोस्टवर अनेक युजर्सनी दिलखुलास स्माईलीही तयार केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extraordinary experience monkey hugs shashi tharoor falls asleep on his lap scj