देशभर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील बाह्या सरसावल्या. निवडणूक  डोळ्यासमोर ठेऊन तब्बल दोन वर्षे अपडेटची वाटपाहत असलेला नितीशकुमार यांचा ब्लॉग आता पुन्हा सुरू झालाय. नितीशकुमार यांचा ब्लॉग २०११ पर्यत जोरदारपणे त्यांच्या ‘जेडीयू’च्या आणि बिहार सरकारच्या कामांची माहिती देणाऱ्या मुखपत्राची भूमिका पारपाडत होता. मात्र, २०११ नंतर नितीशकुमार यांचा ब्लॉग मंदावला व नंतर तो अपडेट होणे थांबला. आज(गुरूवार) अचानक दोन वर्षांच्या अंतराळा नंतर त्यांच्या ब्लॉगवर अपडेट आली आणि नितीशकुमार यांचा ब्लॉग पुन्हा धडधडू लागला.
नितीशकुमार यांनी त्यांच्या आधीच्या ब्लॉग पोस्टमध्ये बिहार सरकारच्या ध्येय-धोरणांवर, सरकारने घेतलेल्या निर्णयांवर लिखान केले आहे. बिहार विधानसभेच्या गेल्या निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी या ब्लॉगद्वारे लोकांना आवाहन करण्यात आले होते. नितीशकुमार यांचा ब्लॉग बिहारमधील तरूण वाचकांवर लक्ष केंद्रीत करून, तरूणांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी लिहिला जात आहे.
या घटनेबरोबर नितीशकुमार भाजपचे जेष्ठनेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या काही निवडक राजकीय व्यक्तिंपैकी आहेत जे ब्लॉगच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवतात.           

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा