अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाचा व्हायरल झालेला फोटो हा राम मंदिराच्या गाभाऱ्यातील नाही. गाभाऱ्यातील मूर्ती अद्याप झाकून ठेवलेली आहे. व्हायरल झालेल्या फोटोची चौकशी करू, अशी प्रतिक्रिया श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याशिवाय प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे उघडले जात नाहीत. ते झाकलेलेच असतात. सध्या ज्या मूर्तीचा फोटो व्हायरल होत आहे, ती खरी मूर्ती नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेआधीच फोटो व्हायरल झाले, या प्रकरणाची चौकशी करू, असेही आचार्य सत्येंद्र दास म्हणाले आहेत.

मधुर हास्य! कपाळावर टिळा, कोदंडधारी राम मूर्तीचे प्रसन्न भाव पाहून आपोआप हात जोडले जातील

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

काय म्हणाले आचार्य सत्येंद्र दास?

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आचार्य सत्येंद्र दास यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि रामलल्लाच्या मूर्तीबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, प्राणप्रतिष्ठा सोहळा होण्यापूर्वी रामलल्लाच्या मूर्तीचे डोळे दाखविता येणार नाहीत. जेव्हा हा सोहळा होईल, तेव्हाच डोळे दिसतील. जर डोळे दिसणारा फोटो व्हायरल झाला असेल तर तो कुणी केला? याची चौकशी आम्ही करू.

आचार्य सत्येंद्र दास पुढे म्हणाले की, रामलल्लाची पूर्ण मूर्ती सध्या झाकून ठेवलेली आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा होण्याआधी मूर्तीचा श्रृंगार करण्यात येईल, धर्मातील कर्मकांडाप्रमाणे विधीवत श्रृंगार पार पडेल. मात्र डोळे सोहळ्यानंतरच दाखविण्यात येतात, असेही ते म्हणाले.

शुक्रवारी सोशल मीडियावर रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला. ५१ इंचाची काळ्या दगडातील मूर्तीचा फोटो व्हायरल झाला होता. पाच वर्षांच्या रामलल्लाची ही मूर्ती असल्याचे बोलले गेले. मूर्तीच्या हातात धनुष्य-बाणही दिसत आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती साकारली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करत आहेत, काँग्रेस मात्र…”; राम मंदिराचे मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांची बोचरी टीका

कोण आहेत अरुण योगीराज?

अरूण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत. त्यांचं घराणंच मूर्तीकारांचं आहे. कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतं. अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. अरुण यांना मूर्ती साकारण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आहे.

कशी आहे श्रीरामाची मूर्ती?

  • गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.
  • ५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे.
  • शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंच उच आहे.
  • या मूर्तीचं वजन २०० किलो आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल.