फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या सामाजिक संकेतस्थळावर पुस्तकांविषयीचे एक पान समाविष्ट केले आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या झकरबर्ग यांनी वेगवेगळ्या श्रद्धा, संस्कृती व तंत्रज्ञान याविषयी २०१५ मध्ये दर आठवडय़ाला एक पुस्तक वाचायचे ठरवले आहे.
झकरबर्ग यांनी त्यासाठी ‘अ इयर ऑफ बुक्स’ हे पान सुरू केले असून त्यांच्या मित्रांना या प्रकल्पात सहभागी होण्यास सांगितले आहेत. या पानाला एक लाख लाइक्स मिळाले असून काल दुपारी ते जारी करण्यात आले. आपल्या वाचनाच्या आव्हानाबाबत ते म्हणाले, की पुस्तके वाचणे हा एक बौद्धिक भूक पूर्ण करणारा अनुभव असतो. पुस्तके एखाद्या विषयाची परिपूर्ण माहिती देतात. आज जी प्रसारमाध्यमे आहेत, त्यात अधिक खोलीवर नेणारे माध्यम म्हणून पुस्तके उपयुक्त आहेत. आपण आपले माध्यम खाद्य पुस्तके वाचण्याकडे वळवणार आहोत.
या कार्यक्रमात पहिले पुस्तक मोइजेस नइम यांचे ‘द एंड पॉवर – फ्रॉम बोर्डरूम्स टू बॅटलफील्ड्स अ‍ॅण्ड चर्चेस टू स्टेट्स व्हाय बिइंग इन-चार्ज इजन्ट व्हॉट इट यूज्ड टू बी’ असे आहे. हे पुस्तक अ‍ॅमेझॉन डॉट कॉमवर रविवारीच खपले आहे. त्याची विक्री क्रमवारी १३८ आहे. ‘द एंड पॉवर’ हे पुस्तक अ‍ॅमेझॉनच्या मूव्हर्स अ‍ॅण्ड शेकर्स यादीत असून बेस्ट सेलर यादीतही आहे. व्हेनेझुएलात जन्मलेले नइम हे पुरस्कार विजेते स्तंभलेखक असून दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम सादरकर्ते आहेत व सध्या ‘कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ या संस्थेच्या इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स प्रोग्रॅमचे फेलो आहेत. द एंड पॉवर हे पुस्तक २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेले असून त्यात कमीत कमी लोकांच्या हाती म्हणजे सरकारे, लष्कर व इतर संघटनांकडे पारंपरिक पद्धतीने जास्त अधिकार एकवटले जात होते. त्याकडून जग कसे बदलत गेले व लोकांना कसे अधिकार मिळत गेले, याचे वर्णन त्यात आहे. लोकांना जास्त अधिकार ही महत्त्वाची बाब आहे. टीव्ही सादरकर्त्यां ऑप्रा विन्फ्रे यांनी काही पुस्तकांची निवड वेगळी आहे. त्यांनी स्यू मंक किड्स यांचे ‘द इन्व्हेन्शन ऑफ विंग्ज’ हे पुस्तक निवडले आहे, ती २०१४ मधील सर्वात जास्त विकली गेलेली कादंबरी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा