सोशल मीडियातील सध्याची आघाडीची वेबसाईट फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग पुढील आठवड्यात मंगळवारी लाईव्ह प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नेटिझन्सच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. अशा पद्धतीने लाईव्ह प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जगभरातील नेटिझन्सना एकत्र जोडण्याचा हा फेसबुकचा पहिलाच प्रयत्न आहे.
मंगळवारी, १४ जून रोजी पॅसिफिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री १२ वाजता) हा लाईव्ह प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल. या संदर्भात स्वतः झकरबर्ग यांनी लिहिले आहे की, जेव्हा मी जगभरात फिरतो. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी टाऊन हॉलच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मला आवडते. फेसबुकच्या मुख्यालयातही आम्ही काही प्रश्नोत्तराचे कार्यक्रम केले आहेत. आता लाईव्ह प्रश्नोत्तरामुळे मला वेगवेगळ्या भागातील नेटिझन्सना ऐकायला मिळेल. संवादात्मक पद्धतीने हा कार्यक्रम होईल. तुमच्या आवडीच्या सर्व विषयांना हात घालण्याचा या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रयत्न करू.
प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काय करायचे?
या कार्यक्रमासंबंधी मार्क झकरबर्गच्या फेसबुक पोस्टवर नेटिझन्सनी आपले प्रश्न विचारायचे आहेत. ज्या प्रश्नांना सर्वाधिक लाईक्स मिळतील. त्या प्रश्नांची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. या पोस्टवर विचारण्यात आलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे झकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
Facebook ceo mark zuckerberg: लाईव्ह प्रश्नोत्तरामधून मार्क झकेरबर्ग पुढील आठवड्यात नेटिझन्सच्या भेटीला
मार्क झकरबर्गच्या फेसबुक पोस्टवर नेटिझन्सनी आपले प्रश्न विचारायचे आहेत
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-06-2016 at 10:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook ceo mark zuckerberg to host first live qa