सोशल नेटवर्किंगच्या जालात प्रसिद्ध असलेल्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी एका सामुदायिक स्वास्थ केंद्राला तब्बल तीस कोटी रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती टीम झुकेरबर्गने दिली.
अमेरिकेतल्या कैलिफ येथील रेवेंसवुड फॅमिली हेल्थ सेंटर नावाच्या सामाजिक संस्थेला त्यांच्या विकासकामासाठी ५० लाख अमेरिकी डॉलर
(३० कोटी ९८ लाख) मदत केली. इंटरनेटच्या जालात फेसबुक सुरू करणाऱया या २९ वर्षीय मार्क झुकेरबर्गने फेसबुकच्या प्रसिद्धीनंतर जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले. सामाजिक बांधिलकी दाखवत झुकेरबर्गने याआधीही अनेक संस्थांना मदत केली आहे.
झुकेरबर्गने मदत देऊ केलेल्या हेल्थ सेंटरमध्ये सध्याच्या घडीला वर्षभरात जवळपास ११,००० रुग्णांवर उपचार केले जातात. या हेल्थसेंटरच्या विस्तृतीकरणाचे काम सुरू आहे. या विकास कामासाठी झुकेरबर्गने पुढाकार घेत ३० कोटींची देणगी देऊ केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा