तुमच्या अकाउंटवरून पाठवलेली छायाचित्रे किंवा संदेश अवघ्या दहा सेकंदांत नष्ट होतील असे नवे उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटने सुरू केले आहे. सध्या फेसबुकवर जे पोक नावाचे अ‍ॅप आहे त्याचीच ही सुधारित आवृत्ती आहे. फेसबुकवरील पोक हे अ‍ॅप फारसे वापरले जात नव्हते, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात आली आहे, असे डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे.
आता त्याचे नामकरण फेसबुक पोक असे करण्यात आले आहे, त्याच्या मदतीने उपयोगकर्त्यांना संदेश, पोक, फोटो व दहा सेकंदांत व्हिडिओ मित्रांना पाठवता येतील. हे संदेश किंवा व्हिडिओ १ ते १० सेकंदांत नष्ट होतील. पाठवणारा व ज्याला पाठवला ती व्यक्ती या दोघांनाही नंतर तो संदेश परत कुठूनही काढता येणार नाही. कुठलाही मागमूस न ठेवता संदेश पाठवण्यासाठी पोक अ‍ॅपचा वापर केला जातो तसाच तो येथेही केला जाणार आहे.
जेव्हा तुम्ही हे अ‍ॅप उघडता त्या वेळी पडद्याच्या खालच्या बाजूला असलेल्या आयकॉन संचातून तुम्ही एकाची निवड करून १२० शब्दांचा संदेश टाइप करू शकता, कॅमेरा उघडून छायाचित्र घेऊ शकता व तुम्ही सध्याचा फोटो त्यात निवडू शकत नाही. दहा सेकंदांची व्हिडिओ शूट करू शकता नंतर ज्याला हा संदेश व व्हिडिओ पाठवायचा त्याला तो किती वेळ दिसावा किंवा पाहता यावा हे तुम्ह्ी ठरवू शकता.
जोखमीचे संदेश पाठवण्यासाठी तरुण मंडळी ज्या स्नॅपचॅटचा वापर करतात तसाच काहीसा हा प्रकार आहे. फेसबुकने एक प्रकारे अयोग्य संदेश पाठवण्याला उत्तेजन दिले आहे असे म्हटले जाते त्यावर फेसबुक कंपनीचे म्हणणे असे, की जर तुम्हाला काही आक्षेपार्ह
वाटले, तर तुम्ही गीअर मेन्यूमध्ये जाऊन त्याबाबत कळवू  शकता. 

Story img Loader