WorldWide Facebook Down : मेटाची उपकंपनी असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर डाऊन झालं आहे. फेसबुक लिंक ओपनच होत नसल्याने कोणालाही लॉग इन करता येत नाहीय. यासंदर्भात एक्सवर तक्रारींचा पाऊस पडला आहे. जगभरात ही सेवा ठप्प झाल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी ७.३६ मिनिटांपासून फेसबुकची सेवा ठप्प झाली आहे. फेसबुकच्या वेबसाईटवर ही समस्या उद्भवली आहे. डाऊन डिटेक्टर या वेबसाईटनुसार १५० हून अधिक वापरकर्त्यांनी आतापर्यंत तक्रारी केल्या आहेत. सॉरी समथिंक वेंट राँग असा मेसेज वेबसाईट सुरू केल्यावर येत आहे.

आज सकाळपासून फेसबुक ठप्प झालं असलं तरीही काल (२६ फेब्रुवारी) रात्री मेटाचीच उपकंपनी इन्स्टाग्राम बंद झालं होतं. यासंदर्भातही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पाऊस पडला होता. त्यानंतर थोड्या वेळाने इन्स्टाग्राम सुरू झालं. मात्र, आज सकाळपासून अमेरिका, भारतसह अनेक देशांमध्ये फेसबुक डाऊन झालं आहे.

तासभर फेसबुकची सेवा ठप्प राहिल्यानंतर साडेआठच्या सुमारास ही सेवा पूर्ववत झाली. आता फेसबुकची वेबसाईट सुरू होत असून तुम्ही त्यावर लॉग इन करू शकत आहात. मोबाईलवरील सेवाही आता पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, जगभरात हा आऊट्रेज का निर्माण झाला होता, याबाबत कंपनीकडून कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही.

बातमी अपडेट होत आहे