जिल्हाधिकाऱ्याच्या फेसबुक पेजवर लाचखोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याने सरकारच्या वीज विभागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याने घेतलेली लाच परत करावी लागली आहे.
नव्या विद्युत जोडणीसाठी तामिळनाडू विद्युतनिर्मिती आणि वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार करण्यासाठी १० ग्राहकांनी सोशल नेटवर्किंग साइटस्चा आधार घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक पेजवर या तक्रारी नोंदविण्यात आल्या. येथील जिल्हाधिकारी अन्शुल मिश्रा यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले.
अधिकाऱ्याने लाचखोरीची कबुली दिल्यावर संबंधित ग्राहकांना ती रक्कम परत करण्याचे आदेश मिश्रा यांनी दिले. तसेच त्या अधिकाऱ्याविरोधात दक्षता संचालनालयाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

Story img Loader