फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने तसेच एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला. मार्क सध्या मायकोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा एका स्थानाने खाली आहे.

नक्की वाचा >> तब्बल सहा तासांनंतर Facebook, Instagram, WhatsApp हळूहळू पूर्वपदावर; झुकरबर्ग म्हणाला, “सॉरी, मला माहितीय…”

सोमवारी या कंपनीच्या शेअर्सची मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. सप्टेंबरच्या मध्यापासूनच कंपनीच्या शेअर्सला घरघर लागली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत घसरलेत. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आलीय. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये मार्क एका स्थानाने खाली घसरला असून तो आला बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेलाय. सोमवारी फेसबुकच्या सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला.

१३ सप्टेंबर रोजी वॉल स्ट्रीट जर्नलने काही कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहारांसदर्भात एक वृत्तांकन केलेलं. यामधील एका लेखामध्ये खुलासा करण्यात आलेला की फेसबुकला त्यांच्या प्रोडक्टमधील कमतरता ठाऊक आहेत. या कमतरतांमुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याच अहवालामध्ये ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च सदनामध्ये म्हणजेच कॅपिटल हिल्सजवळच्या दंगलीसंदर्भातील चुकीची माहिती या माध्यमावरुन पसरवण्यात आल्याचाही उल्लेख आहे. या खुलाश्यानंतर सरकारी अधिकारीही सतर्क झाले. त्यानंतर सोमवारी ही गुप्त माहिती उघड करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचाही खुलासा करण्यात आला. याच कारणामुळे फेसबुकच्या शेअर्समध्ये पडझड दिसून येत आहे.

मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कने म्हटलं आहे.

Shocking video of daughter-in-law harassed mother-in-law sun and sasu dispute viral video on social media
“सून कधीच मुलगी होऊ शकत नाही”, पायऱ्यांवर ढकललं, मारहाण केली अन्…, सूनेने केला सासूचा छळ; संतापजनक VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Share Market
येत्या आठवड्यात कशी असेल Share Market ची कामगिरी? अर्थसंकल्पासह ‘हे’ ३ घटक ठरणार महत्त्वाचे
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
Shocking video of a young man died due to making a video while jumping into a river
आयुष्य इतकं स्वस्त असतं का? व्हिडीओ बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हतं झालं, तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल
70% of BSE500 stocks are in a bear phase; investors consider buying the dip before Union Budget 2025.
BSE500 मधील ७० टक्के शेअर्स मंदीच्या टप्प्यात, अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करणे योग्य ठरणार का?
Viral video of Biker got stuck between two buses while overtaking stunt goes wrong
काय गरज होती? ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमधच अडकला, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Nita Ambani Jamewar Saree
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत नीता अंबानींनी नेसली खास साडी, विणायला लागले तब्बल १९०० तास…; पाहा फोटो

तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअ‍ॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाल्याचं सांगण्यात आलं. तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सेवेत व्यत्यय आल्याचे सांगण्यात येत असले तरी कंपनीने नेमके कारण मात्र उघड केलेले नाही. ‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला. नवे संदेश मिळत नसल्याची तक्रार लाखो वापरकर्त्यांनी केली.

Story img Loader