सोशल नेटवर्कींगच्या जालात अग्रेसर असलेले फेसबुक आपले नवे वैशिष्ट्यपूर्ण ‘सर्च टूल’ लवकरच सुरू करणार आहे. या सर्च टूलच्या मदतीने फेसबुकच्या सध्याच्या सर्च टूलच्या क्षमतेत वाढ होणार आहे. त्यामुळे फेसबुकवर इतरांचे पेज शोधणे, छायाचित्र शोधणे, एकादे ठीकाण शोधणे अधिक सोपे होणार आहे.
फेसबुकने हे सर्च टूल जानेवारी महिन्यातच सुरु केले आहे. परंतु, याची प्राथमिक चाचणी करण्यासाठी लघुतत्वावर हे टूल सुरू करण्यात आले आहे. अजूनही ते सर्वांसाठी वापरण्यास खुले करण्यात आलेले नाही. त्यानुसार फेसबुकच्या अभियंत्यांची चाचणी सुरू आहे. पुढील काही आठवड्यात हे नवे सोशल ‘सर्च टूल’ फेसबुक धारकांना वापरता येईल. या ‘सर्च टूल’ला ‘ग्राफ सर्च’ असे नाव देण्यात आले असल्याचेही समजते.
यामार्फत जगभरातील फेसबुक धारकांच्या पेजचा शोध त्वरित घेता येणे शक्य होणार आहे. तसेच यात आपली अधिक माहिती देणाऱया वैशिष्ट्याचाही समावेश करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा