सोशल नेटवर्कच्या जालात अग्रस्थानी असलेल्या फेसबुकने आपल्या नेटवर्किंग साईटवर दहा लाख सक्रिय जाहिरातदारांचा टप्पा पार केला. गेल्या २८ दिवसांची आकडेवारी पाहता दहा लाखाहून अधिक कंपन्यांनी आपली आर्थिक वाटचाल वाढण्यासाठी व कंपनीच्या नफ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने सोशल नेटवर्कच्या जालात कंपनीची जाहीरात करण्यासाठी फेसबुकला प्राधान्य दिले आहे.
या दहा लाख जाहीरातदारांमध्ये मुख्यत्वे लघु-जाहिरातदारांचा जास्त समावेश आहे. फेसबुकच्या संचालकांना या आकड्यात आणखी भर पडण्याची आशा आहे. अगदी, ज्वेलरी विक्रेत्यांपासून ते कपड्यांच्या दुकानांपर्यंत अशा सोळा लाखांहून अधिक लघु-जाहिरातदार फेसबुकला प्राधान्य देण्याची आशा संचालकांनी व्यक्त केली आहे.
लहान-जाहिरातदारांना फेसबुकवर जाहिरातीसाठी येणाऱ्या खर्चाचा अचूक आकडा समजू शकला नसला तरी, ‘ई मार्केटर’ या मार्केट रिचर्स संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २०१२ या वर्षात अमेरिकेतील लहान-जाहिरातदारांनी फेसबुकवर जाहिरातीसाठी ३२०० कोटी खर्च केले असल्याचे म्हटले आहे.
फेसबुकने गाठले दहा लाख जाहिरातदार
सोशल नेटवर्कच्या जालात अग्रस्थानी असलेल्या फेसबुकने आपल्या नेटवर्किंग साईटवर दहा लाख सक्रिय जाहिरातदारांचा टप्पा पार केला. गेल्या २८ दिवसांची आकडेवारी पाहता दहा लाखाहून अधिक कंपन्यांनी आपली

First published on: 19-06-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook reaches 1 million active advertisers