जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असं असेल.

मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.

Kash Patel DOnald Trump
“जय श्री कृष्ण” म्हणत FBI च्या नव्या संचालकांचं सीनेट बैठकीत भाषण; आई-वडिलांच्या सन्मानार्थ केलेल्या कृतीने वेधलं लक्ष
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Puneri poster marketing poster for recruitment went viral on social media
पुणेकरांच्या मार्केटिंगचा नाद नाय! अशा ठिकाणी लावली नोकरीची जाहिरात की…, VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला
रस्त्याच्या मधोमध अचानक करू लागला विचित्र प्रकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
Uzbekistan Chess Player refuses to shake hands with Vaishali on religious grounds Later Apologizes
धार्मिक कारणांमुळे वैशालीशी हात मिळवला नाही; उझबेकिस्तानच्या ग्रँड मास्टरचा खुलासा
Pune Doctor funny medicine prescription viral on social media
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”
MahaKumbh Mela Viral Girl Monalisa faced harrasement and trouble from people hide under blanket video viral
कुटुंबीयांनी अक्षरश: तिच्या अंगावर चादर टाकली अन्…, कुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाची वाईट अवस्था! पाहा धक्कादायक VIDEO

सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अ‍ॅपची नावं बदलली जाणार नाहीत असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच अगदी साध्या शब्दात सांगायचं झाल्यास फेसबुकने केलेला बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही मोठा परिणाम होणार नाहीय. या पुढे आम्ही सर्व कारभार हा फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट या भूमिकेमधून करणार आहोत. यासंदर्भात मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे. या चिन्हामधून आणि नवामधून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मेटा या ब्रॅण्डनेमअंतर्गत प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये काम केलं जाईल. पहिलं म्हणजे सध्या ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांचं आणि दुसरं भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधनासंदर्भातील असणार असं झुकरबर्गने म्हटलं आहे.

Story img Loader