फेसबुक व ट्विटरच्या मदतीने संसर्गजन्य रोग नेमके कुठल्या भागात पसरू शकतात हे समजू शकते, त्याचबरोबर संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी गणितीय प्रारूपेही तयार करता येतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच कल्पना, मानवी भावना आणि माहितीही संसर्गजन्य असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.
वॉटरलू विद्यापीठातील अॅप्लाईड मॅथेमॅटिक्स विभागाचे प्राध्यापक ख्रिस बॉश व येल विद्यापीठाचे अॅलिसन गॅलवनी यांनी संसर्गरोग शास्त्रातील सामाजिक घटक विचारात घेतले. संसर्ग पसरलेल्या भागात समाज या संसर्गाला नेमका कसा प्रतिसाद देतो यावर त्या रोगाचा जैविक प्रसार कसा होत चालला आहे याची माहिती मिळते.
सोशल मीडिया व इतर माहिती स्रोत यांचा वापर लोक नवीन रोगापासून बचावासाठी किंवा संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी काय उपाय करतात याचा अभ्यास करण्यात आला असे बॉश यांचे मत आहे. या माहितीच्या आधारे वैज्ञानिकांनी सामाजिक संसर्ग प्रणाली व जैविक संसर्ग प्रणाली यांची तुलना के ली. संशोधकांच्या मते रोगांप्रमाणेच कल्पना, माहिती, भावना हे सगळे काही संसर्गजन्य असू शकते. बालकांना दिलेल्या लशी, आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याबाबतचे संदेशवहन, ‘सार्स’सारख्या साथीच्या रोगात रूग्णाला बाजूला ठेवण्याबाबतची स्वीकृती या बाबी अशा प्रारूपात लक्षात घेतल्या जातात. त्याच्या मदतीने भाकिताधारित प्रारूप तयार केले तरी ते अचूक असत नाही. हे खरे असले तरी संसर्गजन्य आजारांना लोक कसा प्रतिसाद देतात यावरून तो कुठल्या ठिकाणी कसा पसरत चालला आहे याचा विचार करता येतो, असे बॉश यांचे मत आहे. केवळ रोगाचा प्रसार हा एकच निकष लावून भागत नाही, त्यासाठी जैविक घटकांपेक्षा वेगळे निकष लक्षात घ्यावे लागतात, असेही बॉश यांचे मत आहे. ‘सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
नवी पद्धत
सर्दी व फ्लू पसरण्याच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोक मोठय़ा प्रमाणात लसीकरण करून घेण्याकडे वळतात, त्याच्याजोडीला खोकताना तोंडावर रूमाल लावतात. हे सामाजिक प्रतिसाद जैविक साथीच्या प्रत्यक्ष प्रतिसादापेक्षा चटकन समजणारे नसतात पण ते समजून घेण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे.
कल्पना, मानवी भावना अन् माहितीसुद्धा ‘संसर्गजन्य’
फेसबुक व ट्विटरच्या मदतीने संसर्गजन्य रोग नेमके कुठल्या भागात पसरू शकतात हे समजू शकते, त्याचबरोबर संसर्गजन्य
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-10-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook twitter give clues to prevent disease spread