विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सध्या अनेक मोठ्या कामांचं उद्घाटन होत आहे. नुकताच जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीचाही कार्यक्रम २५ नोव्हेंबरला पार पडला. यानंतर या विमानतळाचं मॉडेल डिझाईन म्हणून एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा फोटो फेसबूक, ट्विटरवर अनेकांनी शेअर करत नोएडा विमानतळाचं आणि एकूणच मोदी सरकारच्या कामाचं भरपूर कौतुकही केलं. यात भाजपाच्या काही नेत्यांचाही समावेश आहे. मात्र, आता या फोटोवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नेमकं या फोटोचं सत्य काय आहे याचाच हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये बांधून पूर्ण होणाऱ्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डिझाईन फोटो म्हणून वापरलेला हा फोटो बीजिंगमधील विमानतळाचा असल्याचं समोर आलं आहे. गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्च या टुलचा वापर केल्यानंतर नोएडाचा म्हणून वापरलेला हा फोटो आत्ताचा नसून २०१९ मधील असल्याचं समोर आलं आहे. चीनमधील बीजिंग डॅक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू झाल्यानंतर जगभरात हे फोटो व्हायरल झाले होते. हेच फोटो आता भारतातील नोएडा विमानतळाचे म्हणून वापरले जात आहेत.

कोणत्या भाजपा नेत्यांकडून बीजिंगच्या विमानतळाचा फोटो शेअर?

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल, उत्तर प्रदेश भाजपाचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह या नेत्यांनीही बीजिंग विमानतळाचा फोटो नोएडा विमानतळाचा म्हणून वापरला. यातील अनेकांनी नंतर आपले ट्वीट आणि पोस्ट डिलीट केल्या. याबाबत फॅक्ट चेक करणाऱ्या अल्ट न्यूज, द क्विंट या संकेतस्थळांनी रिपोर्टिंग केलं आहे.

मग नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कसं असणार आहे?

नोएडा विमानतळ कसं असेल याचा एक व्हिडीओ माहिती आणि प्रसारण खात्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडीओत पाहता येतो. हाच व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी झाली तेव्हाही दाखवण्यात आला होता.

हेही वाचा : Photos : पंतप्रधान मोदींनी पायाभरणी केलेलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कसं असणार? पाहा फोटो…

माय गव्हर्नमेंट हिंदी या ट्विटर हँडलने देखील नोएडा विमानतळाच्या डिझाईनविषयी माहिती देत एक व्हिडीओ शेअर केलाय.