नामांतर केल्याने टीकेला सामोरं जावं लागत असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अजून एका जागेचं नाव बदललं आहे. योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नामांतर अयोध्या केलं आहे. अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्यासंदर्भात घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यासंबंधी कोणताही उल्लेख योगी आदित्यनाथ यांनी केला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमासाठी दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किंवा प्रथम नागरिक किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अजून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असून त्याला राजा दसरथाचं नाव देण्यात येणार आहे. तसंच एक विमानतळ उभारण्यात येणार असून त्याला प्रभू रामाचं नाव देणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.

आम्ही आमचा भूतकाळ पुन्हा जोडण्यासाठी अयोध्येला आलो आहोत. अयोध्या ही रामाची ओळख आहे. अयोध्येची ओळख अयोध्या अशीच राहिली आहे. अयोध्येसोबत कोणीही अन्याय करु शकत नाही असंही योगी आदित्यनाथ बोलले आहेत. तसंच एक नवीन संकल्प घेऊन आलो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

याआधी कोणी मुख्यमंत्री अयोध्येत आला होता का ? असा सवाल विचारताना मी दीड वर्षात सहा वेळा अयोध्येला आलो असं त्यांनी सांगितलं. फक्त घोषणांपुरतं आपल्या देवांना मर्यादित ठेवलं गेलं नाही पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.