अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी गांधीनगर भागातील एका बनावट न्यायालयाचे पितळ उघड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी २०१९ पासून सुरू असलेल्या एक कारस्थानी योजना उघड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मॉरिस सॅम्युअल ख्रिाश्चन या व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिस ख्रिाश्चन स्वत: न्यायाधीश असल्याचे भासवत फसव्या लवादाच्या माध्यमातून विशेषत: जमीन व्यवहाराच्या खटल्यांचा निवाडा करत होता. त्यासाठी त्याने बनावट न्यायालयही अशा पद्धतीने उभारले होते की पक्षकारांना ते अस्सल वाटत. अशा प्रकारे त्याने अनेकांची फसवणूक केली होती.
हेही वाचा >>> Flight Receives Bomb Threat : २४ तासांत ८० अफवा; नऊ दिवसांत विमान कंपन्यांना ६०० कोटींचे नुकसान
चौकशीमध्ये असे दिसून आले की, ख्रिाश्चन जमिनीच्या वादात अडकलेल्या संशयास्पद व्यक्तींना हेरत असे. त्यानंतर भरपूर शुल्काच्या बदल्यात त्यांच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्याचे आश्वासन देत असे. अशा प्रकारे त्याने अशिलांच्या बाजूने अनेक निकाल दिले होते. ख्रिाश्चनने सर्वात प्रथम २०१९मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेल्या सरकारी जमिनीच्या खटल्याचा निकाल दिला. त्यामध्ये त्याच्या अशिलाने संबंधित जमिनीच्या उताऱ्यावर आपले नाव लावण्यासाठी खटला दाखल केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.