नवी दिल्ली : शासकीय कार्यालयांतून ईमेलवर संशयास्पद ई-नोटीस प्राप्त झाली असेल तर नागरिकांनी इंटरनेटवर संकेतस्थळाचे अधिकृत नाव तपासावे आणि नोटिशीत नमूद केलेल्या विभागाला संपर्क करावा, अशी सूचना केंद्रीय गृह विभागाच्या सायबर गुन्हे शाखेने रविवारी दिली.

शासकीय ई-नोटिशीच्या नावाखाली अनेक फसवे ईमेल पाठवले जात आहेत, त्यामुळे वापरकर्त्यांनी सजग राहावे, असे आवाहन भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (आय४सी) सार्वजनिक जाहिरातीच्या माध्यमातून केले आहे. अशा प्रकारच्या फसव्या नोटिशींमुळे नागरिक सायबर फसवणुकीला बळी पडू शकतात, असा इशारा ‘आय४सी’ने दिला असून ईमेलच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.

Nagpur Police smart experiment to provide instant information about crimes
कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळेल पाच मिनिटांत! नागपूर पोलिसांचा ‘स्मार्ट’ प्रयोग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Marathi mandatory in government offices news in marathi
सरकारी कार्यालयात ‘मराठीतच बोला!’ कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई
Day one glitches in Mantralaya facial recognition system
मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ; ‘चेहरा पडताळणी’साठी करण्यात आलेल्या अट्टहासाने कर्मचारी हैराण
What are Blue Corner and Red Corner Notices issued by Interpol
इंटरपोलकडून जारी होणाऱ्या ब्लू कॉर्नर, रेड कॅार्नर नोटिस म्हणजे काय? किती महत्त्व आहे अशा नोटिसांना?
Thackeray groups protest against ST ticket price hike in thane
ठाकरे गटाचे एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन
spa, massage center , High Court,
स्पा, मसाज सेंटरमधील कामकाजाचे नियमन होणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर

हेही वाचा >>> अतिआत्मविश्वासाचा फटका! प्रदेश भाजपच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांचे आत्मपरीक्षण

गृह मंत्रालयाबरोबरच या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिल्ली पोलीस सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे विभाग, केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग, गुप्तचर विभाग आणि दिल्लीचा सायबर विभाग यांची नावे, स्वाक्षरी, शिक्के आणि बोधचिन्ह यांचा समावेश असलेल्या फसव्या ईमेलबाबत वापरकर्त्यांना सावध करणारी एक सार्वजनिक सूचना जारी केली होती. या ई-मेलमधून प्राप्तकर्त्यांवर विशेषत: लैंगिक गुन्हेगारीचे आरोप करण्यात येतात, असे ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांकडे किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला अर्थ विभागाने दिला आहे. ‘आय४सी’ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अशाच प्रकारची सूचना जारी केली होती.

ईमेलमधील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी…

क्लिक करण्यापूर्वी किंवा अशा ईमेलला उत्तर देण्यापूर्वी खातरजमा करण्यासाठी ‘आय४सी’ने काही सूचना केल्या आहेत. ही ईमेल gov. in ने संपणाऱ्या संकेतस्थळावरून तयार झाली आहे का, हे तपासा; ईमेलमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांच्या नावासंबंधी इंटरनेटवर माहिती तपासा; ज्या विभागातून ईमेल प्राप्त झाले असल्याचा दावा आहे, त्या विभागाला संपर्क करून पडताळणी करून घ्या.

Story img Loader