Motivation Speaker Domestic Violence: प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विवेक बिंद्रावर त्याच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. पोलिसांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडाच्या सेक्टर १२६ मध्ये बिंद्राच्या मेहुण्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की ही घटना नोएडाच्या सेक्टर ९४ मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सीमध्ये घडली आहे, जिथे हे जोडपे राहत होते.
७ डिसेंबरच्या पहाटे, बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादामध्ये जेव्हा यानिकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिंद्रा यांच्याकडून तिच्यावर शारीरिक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे यानिकाच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एफआयआरमध्ये नमूद केलेल्या तपशीलांनुसार, बिंद्रा आणि यानिकाचे ६ डिसेंबर रोजी लग्न झाले. मात्र, लग्नाच्या काहीच तासांनंतर बिंद्राने यानिकाला एका खोलीत नेले, तिला शिवीगाळ केली, तिचे केस ओढले आणि मारहाण केली. मारहाणीमुळे यानिकाला नीट ऐकू येत नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. बिंद्राने तिचा फोनही तोडला.
हे ही वाचा<< जिवंत पतीला पत्नीस विधवेसारखं पाहावं लागणं हे क्रूरच! घटस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय काय?
बिंद्रा, बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड (BBPL) चे CEO असून युट्युब व इंस्टाग्रामवर त्याचे लाखो लोक फॉलोवर्स आहेत. बिंद्राचे नाव एका कथित घोटाळ्याच्या केंद्रस्थानी सुद्धा आहेत, असे प्रसिद्ध YouTuber संदीप माहेश्वरी यांनी सांगितले होते. महेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर “बिग स्कॅम एक्सपोज” नावाचा एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांनी बिंद्राच्या कंपनीने फसवणूक केल्याचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तिपत्रक सादर केले. मात्र, बिंद्राने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.