फरीदाबादमधील तरुणी सध्या एका बाइकस्वाराच्या दहशीतत आहेत. स्प्लेंडर बाइकवर येणारा हा तरुण रस्त्याने जाणाऱ्या मुलींना किंवा महिलांना रस्ता विचारण्याचा बहाणा करुन थांबवतो आणि नंतर पँटची चैन खोलून अश्लिल कृत्य करतो.

एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या चार ते पाच दिवसांपासून हा तरुण सेक्टर 31 सह अन्य काही सेक्टरमध्ये जाऊन हे घाणेरडे कृत्य करत आहे. रविवारी(दि.16) सेक्टर 31 मधील एका कॉलनीतील नागरिकांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तरुणाच्या या कृत्यामुळे परिसरातील तरुणी घराबाहेर पडण्याआधी विचार करतायेत, पालक देखील धास्तावले असून तरुणींना एकटं घराबाहेर पडू नका असा सल्ला देतायेत. रविवारी त्या आरोपीला एका तरुणीने स्प्रिंग फिल्ड कॉलनीमध्ये बघितलं, पण पालकांना बोलवायला गेली तोपर्यंत त्याने पळ काढला होता. तो तरुण कुठेही दिसल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, आम्ही आरोपीला पकडण्याचे प्रयत्न करत आहोत अशी माहिती डीसीपी लोकेंद्र सिंह यांनी दिली आहे.

Story img Loader