नवी दिल्ली : दिल्ली शहर आणि उपनगरांच्या हवेची गुणवत्ता बुधवारी पुन्हा एकदा घातक श्रेणीपर्यंत घसरली. शेजारील पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पिकांच्या कापणीनंतर शेतात उरलेले ताटे, खुंट जाळण्याच्या पद्धतीमुळे दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बुधवारी ४२६ इतका नोंदवला गेला, मंगळवारी तो ३९५ इतका होता.
शेजारील राज्यांमध्ये शेतात उरलेली ताटे, खुंट जाळल्यामुळे होणारे प्रदूषण ३८ टक्के इतके असते. असे डिसिजन सपोर्ट सिस्टीमने संकलित केलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे. दिल्लीशेजारील गाझियाबादमध्ये ३८४, गुरुग्राममध्ये ३८५, नोएडात ४०५, ग्रेटर नोएडामध्ये ४७८ आणि फरीदाबादमध्ये ४२५ इतका एक्यूआय नोंदवला गेला.
हेही वाचा >>> ‘क्यू एस मानांकनां’त भारताची चीनवर मात; यादीत १४८ भारतीय विद्यापीठांना स्थान; मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम
प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून अॅप-आधारित टॅक्सी सेवांना दिल्लीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसेच कनॉट प्लेस येथील स्मॉग टॉवर तातडीने पुन्हा सुरू करण्याच्या सूचना सरकारतर्फे देण्यात आल्या. दिल्लीमधील शाळांच्या हिवाळी सुटीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पूर्वी ३ ते १० नोव्हेंबर या कालावधीत हिवाळी सुटी जाहीर करण्यात आली होती, त्यामध्ये बदल करून आता ९ ते १८ नोव्हेंबर अशी दहा दिवसांच्या सुटीची घोषणा करण्यात आली आहे.
सध्या दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे एका दिवसात १० सिगारेट ओढण्याइतके घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सम-विषम वाहन क्रमांक योजना लांबणीवर
दिल्लीमध्ये सम-विषम वाहन क्रमांक योजना लांबणीवर टाकत असल्याचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी बुधवारी जाहीर केले. प्रदूषण कमी करण्यासाठी या योजनेचा खरोखर काही उपयोग होतो का, असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी विचारला. आता या योजनेच्या परिणामकारकतेचा आढावा घेऊन त्यानंतर आदेश मिळाल्यानंतर यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे राय यांनी सांगितले. याची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
५१० किलो फटाके जप्त
दिल्लीमध्ये पोलिसांनी दोघांकडून ५१० किलो फटाके जप्त केले आणि त्यांना अटक केली. ईशान्य दिल्लीतील करतार नगर आणि सोनिया विहार या भागांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्लीमध्ये फटाक्यांवर सरसकट बंदी आहे.