आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होणार आणि तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण होणार या वृत्ताचा धक्का बसल्यामुळे येथे एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. मेहबूब बाशा असे त्या शेतकऱ्याचे नांव असून तो ४८ वर्षांचा होता. दूरचित्रवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेले आंध्र विभाजनाचे वृत्त बाशा याने ऐकले आणि त्या धक्क्य़ाने तो एकदम कोसळला. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले अशी माहिती, त्याच्या कुटुंबियांनी दिली.

Story img Loader