Uttar Pradesh Farmer : उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका शेतकऱ्याने फुलकोबीच्या पिकाला योग्य दर न मिळाल्यामुळे हताश होवून हातात आलेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला आहे. शेतकऱ्यांने पिकवलेल्या फुलकोबीला योग्य दर न मिळाल्याने हे पाऊल उचललं आहे. फुलकोबीचे दर पडल्यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. अमरोहा येथील स्थानिक बाजारपेठेत एका आठवड्यापेक्षा जास्त काळ फुलकोबीला १ रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यामुळे येथील फुलकोबी पिकवणारे सर्वच शेतकरी हदबलता व्यक्त करत आहेत, तर काहींनी उभ्या पीकावर ट्रॅक्टर चालवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरोहा येथील शेतकरी सामान्यत: स्थानिक बाजारपेठेत त्यांचा माल विकतात. त्यानंतर तो माल दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमधील मोठ्या मंडईमध्ये जातो. आता या हंगामात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी पिकाची पेरणी झालेली आहे. बाजारात मागणीपेक्षा जास्त फुलकोबी आल्यामुळे त्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थीक तोट्याला समोरं जावं लागलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

अमरोहमधील शेतकरी लालसिंग सैनी यांनी या संदर्भात बोलताना म्हटलं की, “फुलकोबी आणि कोबी पिकवण्यासाठी प्रति बिघा ८,००० ते १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. तसेच घाऊक भाव सुरुवातीला स्थिर होते. डिसेंबर-जानेवारीत घाऊक बाजारात ३०-४० रुपये दर होते. दिल्लीत फुलकोबी ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. मात्र, आम्हाला आमचे पीक राजधानीत नेण्यासाठी वाहतुकीला मोठा खर्च येतो. त्यामुळे ते देखील आम्हाला परवडत नाही. याचा अमरोहातील कल्याणपुरा गावाला सर्वाधिक फटका बसला. फुलकोबी आमच्यासाठी अत्यंत तोट्याची ठरली आहे”, असं ते म्हणाले.

अमरोहा येथील एका शेतकरी जगतवीर सैनी यांनी म्हटलं की, “पीक उत्पादनाचा खर्च प्रति बिघा १०,००० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात शेतात नांगरणी, रोपे लावणे, खते, सिंचन आणि कीटकनाशकांचा वापर यांचा समावेश आहे. पीक आता विकण्यासाठी आलं आहे. मात्र, आम्ही उत्पादन खर्च देखील वसूल करू शकलो नाही.” दरम्यान, याबाबत अमरोहा जिल्हा फलोत्पादन अधिकारी संतोष कुमार यांनी म्हटलं की, “गेल्या वर्षी याच पिकाला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला होता. त्यामुळेच या वर्षीही अमरोहामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. मात्र, बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे.”