या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्नाटक विधानसभेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यात दोन कृषी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्यांच्या  विरोधात शेतक ऱ्यांनी विधानसौधाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संघटनांनी बुधवारी विधानसौधावर मोर्चा काढून या दोन कायद्यातील दुरुस्त्यांना विरोध केला आहे.

राज्य सरकारने या दोन्ही कृषी कायद्यातील दुरुस्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.  कर्नाटक जमीन सुधारणा (दुरुस्ती) विधेयक २०२०, कृषी उत्पादन विपण (नियमन व विकास) दुरुस्ती विधेयक २०२० या दोन विधेयकांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यातील कर्नाटक जमीन सुधारणा (दुरुस्ती) विधेयक २०२० विधानसभेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असून कृषी उत्पादन विपण (नियमन व विकास) दुरुस्ती विधेयक २०२० विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मंजूर झाले असून त्याला विधानपरिषदेची मंजुरी मिळणे बाकी आहे.

कर्नाटक राज्य रयत संघ व हासीरु सेने तसेच इतर संघटनांनी या विधेयकाविरोधात आंदोलनाचे आवाहन केले होते. मंगळवारच्या भारत बंदमध्येही या संघटना सहभागी होत्या. बुधवारी अनेक निदर्शक बेंगळूरुत रेल्वेने आले होते. त्यामुळे बेंगळूरु शहर रेल्वेस्थानकावर सुरक्षा कडक करण्यात आली होती. रेल्वे स्थानक ते आनंद राव सर्कल दरम्यान शेतक ऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. तो फ्रीडम पार्क येथे आला, नंतर शेतकरी आंदोलकांनी  विधानसौधाकडे कूच केली. पोलिसांनी विधानसौधाकडे जाणारे सर्व रस्ते अडथळे लावून बंद केले होते. त्याशिवाय विधानसौधा परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली होती.