Farooq Abdullah IC 814 the Kandahar Plane Hijack : अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४ : दी कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज गेल्या महिन्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, अरविंद स्वामी, पत्रलेखा व अभिनेता विजय वर्मा या कलाकारांनी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २४ डिसेंबर १९९९ रोजी पाच दहशतवाद्यांनी नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला जाणारं इंडियन एअरलाईन्सचं एक विमान उड्डाणानंतर ४० मिनिटांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांनी ते विमान अमृतसर, लाहोर, दुबई असा प्रवास करून कंदहारला नेलं.

दहशतवाद्यांनी आठ दिवस विमान त्यांच्या ताब्यात ठेवलं आणि विमानातील प्रवासी व क्रू सदस्यांना ओलीस ठेवलं. या सर्वांना मुक्त करण्याच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे दहशतवादी मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या तीन दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारने विमानातील प्रवाीस व क्रू सदस्यांच्या बदल्यात तिन्ही दहशतवाद्यांना मुक्त केलं. प्रवासी व विमानाच्या बदल्यात तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंह हे त्या दहशतवाद्यांना विशेष विमानाने कंदहारला घेऊन गेले. तिथे ओलिस ठेवलेले प्रवासी व क्रू आणि अतिरेकी यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली. या दहशतवाद्यांनी त्यानंतर जगभर मोठा उच्छाद मांडला. त्यामुळे आजही अनेकांना वाटतं की भरत सरकारने तेव्हा या दहशतवाद्यांना मुक्त करायला नको होतं.

Rahul Gandhi booked for attempt to murder: Case details emerge.
Attempt To Murder : राहुल गांधींविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार; संसदेत खासदार जखमी झाल्यानंतर भाजपाकडून मोठे पाऊल
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”,…
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधी मागणीवर ठाम, “अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्यांनी राजीनामा…”
What Mallikarjun Kharge Said?
Mallikarjun Kharge : “भाजपा खासदारांकडून आमच्यावर हल्ला, आमची खिल्ली उडवली…”, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
Image of Congress leader Mallikarjun Kharge
Parliament Uproar : “भाजपा खासदारांनी धक्का दिला अन् माझ्या गुडघ्याला दुखापत झाली”, सभापतींना लिहिलेले खरगेंचे पत्र व्हायरल
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं
Laxman Savadi
Karnataka : “मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा”, कर्नाटकच्या आमदाराची विधानसभेत मागणी; म्हणाले, “आमचे पूर्वज…”
Mystery Illness in Jammu and Kashmir
Jammu and Kashmir Mystery Illness : जम्मू काश्मीरच्या राजौरीतील एका गावाला गूढ आजाराचा विळखा; मृतांची संख्या ८ वर
sensex today latest update
बाजारपेठेत कोलाहल! Sensex च्या गटांगळ्या, १२०० अंकांनी घसरला; Share Market मध्ये नेमकं काय घडलं?

दरम्यान, या विमान अपहरण प्रकरणावर आधारित वेब सीरिजची सर्वत्र चर्चा आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. अशातच जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री (विमान अपहरण झालं तेव्हाचे) फारुक अब्दुल्लाह यांनी त्या घटनेवर भाष्य केलं आहे.

हे ही वाचा >> Sitaram Yechury: सीताराम येचुरी कोण होते? डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाजपा-संघाचे कडवे टीकाकार काळाच्या पडद्याआड

त्या दहशतवाद्यांना सोडून आपण मोठी चूक केली : अब्दुल्लाह

भारत सरकारने तुरुंगातून मुक्त केलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर हा तेव्हा काश्मीरमधील तुरुंगात होता. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्लाह हे त्यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. अब्दुल्लाह यांनी मुश्ताक अहमद जरगरला तुरुंगातून सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकारने अब्दुल्लाह यांच्याकडे अनेक विनंत्या करून जरगरला सोडण्यास राजी करून घेतलं होतं. यावर अब्दुल्लाह यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. त्यांनी आज तकशी काही वेळापूर्वी बातचीत केली. अब्दुल्लाह म्हणाले, “त्या तीन दहशतवाद्यांना सोडून आपण मोठी चूक केली होती. आज आपण बघतोय त्यांनी जगभर काय उच्छाद मांडलाय”.

हे ही वाचा >> Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

अब्दुल्लाह यांनी भाजपा सरकारला सुनावलं

फारुक अब्दुल्लाह म्हणाले, “या लोकांनी (तत्कालीन भाजपाप्रणित एनडीए सरकार) तीन दहशतवाद्यांना तुरुंगातून मुक्त केलं होतं. त्याचे परिणाम आपण पाहतोय. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. मी त्यांना म्हणालो होतो, असं करू नका, या दहशतवाद्यांना सोडू नका. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. हे लोक चुकांवर चुका करत आले आहेत. हे लोक रोज नव्या चुका करतील आणि त्यांना वाटतंय की ते भारत मजबूत करू शकतील. संबंध सुधारण्यासाठी आपण पाकिस्तानशी बातचीत करायला हवी, जी आपण करत नाही. मात्र, आपण चीनशी च्चा करतोय. आपण त्यांच्याशी का बोलतोय? चीननेही आपली जमीन बळकावली आहे. ते ही आपल्या जमिनीवर येऊन बसले आहेत. अटल बिहारी वाजपेही म्हणायचे, मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाहीत. आपण मित्र बनून राहू तर दोघेही विकसित होऊ. शत्रू बनून राहिलो तर दोघेही कमकुवत होऊ. हे त्यांच्या वरिष्ठ नेत्याचं मत होतं. पण आताचे लोक (विद्यमान भाजपा सरकार) शत्रूत्व घेऊन बसलेत”.

Story img Loader