Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये निकालाआधीच घडामोडींना वेग, पीडीपीबरोबर जाणार का? फारुख अब्दुल्लांचं मोठं विधान; म्हणाले, “का नाही?”

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला.

Farooq Abdullah On Mehbooba Mufti :
फारुख अब्दुल्ल, महबूबा मुफ्ती, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Jammu and Kashmir Result 2024 : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या ८ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं आहे. खरं तर जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Result 2024) विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामुळे काही स्थानिक पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एक मोठं विधान केलं आहे.

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलं. त्यांनी म्हटलं की, भारतीय जनता पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशी गठबंधन करण्यास आम्ही तयार असल्याचं विधान फारूक अब्दुल्ला यांनी केलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

हेही वाचा : Priyanka Gandhi : “महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार”, व्हिडीओ शेअर करत प्रियांका गांधींचा महायुतीला इशारा

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना पत्रकारांनी पीडीपीबरोबर आघाडी करण्यासंदर्भात प्रश्न विचारला. तुम्हाला पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीबरोबर युती करायला आवडेल का? असे विचारले असता फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलं की, “का नाही? काय फरक पडतो? मला खात्री आहे की काँग्रेसचाही यावर आक्षेप नसेल”, असं फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी असंही स्पष्ट केलं की, आम्ही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी यामध्ये काही अडचण येण्याचं कारण नाही. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.

फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार का?

यावेळी फारुख अब्दुल्ला यांना असेही विचारण्यात आले की, आघाडी सरकार स्थापन झाल्यास ते मुख्यमंत्री होणार का? यावर उत्तर देताना फारूख अब्दुल्ला म्हणाले, “मी मुख्यमंत्री होणार नाही. मी माझे काम केले आहे. आता आपण मजबूत सरकार कसे बनवायचे हा प्रश्न असेल. तसेच सरकार स्थापनेसाठी अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासाठी आपण त्यांच्याशी बोलण्यास तयार आहोत”, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farooq abdullah on jammu and kashmir result 2024 mehbooba mufti jk elections post poll alliance gkt

First published on: 07-10-2024 at 22:18 IST
Show comments