जम्मू-काश्मीर सरकारमधील काही मंत्र्यांना राज्यात स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराकडून पैसे दिले जात असल्याच्या माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी केली. 
लाजिरवाणा ‘लष्करी गोंधळ’

‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंग यांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून जम्मू-काश्मीरमधील काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याची खळबळजनक माहिती दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, सिंग यांनी हे अतिशय धक्कादायक विधान केले आहे. त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. लष्कराने राजकीय पक्षांच्या नेत्यांना पैसे देण्याचे काहीच कारण नाही. लष्कराला राजकारणापासून दूरच ठेवले पाहिजे. जर त्यांनी असे केले असेल, तर त्यांनी अत्यंत चुकीचा काम केले आहे.
माझ्यावरील आरोप खोडसाळपणाचे
सिंग लष्करप्रमुख असताना काश्मीरमधील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती लष्कराच्या एका गोपनीय अहवालातून पुढे आली होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्यावरील सर्व आरोप सिंग यांनी फेटाळले. हे सर्व आरोप खोटे आणि खोडसाळपणाचे असल्याचे सिंग म्हणाले होते.
सिंग यांनी केलेल्या आरोपांबद्दल चिंता व्यक्त करून अब्दुल्ला म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची वेळ आलीये, असे मला वाटते. लष्कराने राजकीय नेत्यांना किती पैसे दिले. कोणकोणत्या नेत्याला ते मिळाले आणि त्याचा काय वापर झाला, हे शोधले गेलेच पाहिजे.
माजी लष्करप्रमुख हेरगिरीमुळे गोत्यात 

Story img Loader