सध्या गुगल सर्च इंजिन प्रचलित असून त्यावर मात करू शकेल असे सर्च इंजिन फारसे नाही, त्यामुळे या सर्च इंजिनला मागे टाकू शकेल असे सर्च इंजिन (इंटरनेट शोधयंत्र) तयार केल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. सध्याच्या सर्व सर्च इंजिनना त्याने मागे टाकले असून, लोक त्याच्या मदतीने इंटरनेटवर चटकन कशाचाही शोध घेऊ शकतात.
सायनेट (एससीआयएनइटी) असे त्याचे नाव असून ते हेलसिंकी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे एचआयआयटी या संस्थेने तयार केले आहे. ते इतर शोधयंत्रांपेत्रा वेगळे आहे, कारण ते इंटरनेट सर्चचे रूपांतर ओळख पटवण्याच्या कामात करते. त्यात शोधातील काही प्रमुख शब्द वापरले जातात. लोक सायनेट या सर्च इंजिनचा वापर विविध प्रकारच्या विषयांवरील माहिती शोधण्यासाठी करू शकतात व त्यामुळे चटकन तुम्हाला निष्कर्ष मिळू शकतात. एखाद्या प्रश्नाचे रूपांतर सूत्रबद्ध रूपात करून यात शोध घेतला जातो. एकदा शोधविषय दिल्यानंतर सायनेट त्यातील अनेक प्रमुख शब्द व विषय शोधपट्टीत दाखवते व हे विषय एकमेकांशी कसे निगडित आहेत याचेही दिशादर्शन होते. टॉपिक रडारच्या चौकटीत संबंधित शब्द दाखवले जातात.
सायनेटचा वापर करणाऱ्या लोकांना संबंधित विषयावर जलद व विविध प्रकारची माहिती मिळू शकते. काय शोधायचे आहे व ते प्रश्नबद्ध कसे करायचे हे समजत नसते तेव्हा हे शोधयंत्र चांगली मदत करते. टॉपिक रडारवर आलेल्या शब्दांवरून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या विषयाच्या जवळ जाऊ शकता.
यात तुम्हाला प्रत्येक पानात जाऊन पुन्हा नवीन शोधशब्द द्यावे लागत नाहीत. सायनेटच तुम्हाला जी माहिती हवी आहे ती लवकर शोधून देण्यास मदत करते असे प्रकल्प समन्वयक टुक्का रूस्टालो यांनी सांगितले.
गुगलपेक्षा वेगवान सर्च इंजिन शोधण्यात यश
सध्या गुगल सर्च इंजिन प्रचलित असून त्यावर मात करू शकेल असे सर्च इंजिन फारसे नाही, त्यामुळे या सर्च इंजिनला मागे टाकू शकेल असे सर्च इंजिन (इंटरनेट शोधयंत्र) तयार केल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2015 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faster than the google search engine discovred