गोव्यात दोन भावांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. दोन्ही मुलांसह त्यांची आईदेखील घरातच बेशुद्धावस्थेत आढळली आहे. दोन्ही भाऊ भुकेने मरण पावल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांची आई दोन्ही मुलांकडून कडक उपवास करून घेत होती. गेल्या अनेक दिवसांपासून ही दोन्ही मुलं दिवसाला केवळ एक खजूर खात होती. कॅशेक्सिया आणि कुपोषण हे दोन्ही मुलांच्या मृत्यूचं संभाव्य कारण असल्याचं शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केलं आहे.

मोहम्द जुबैर खान आणि अफान खान अशी या मृत मुलांची नावं आहेत. त्यांची आई रुक्साना खान हिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. तिच्या मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार आणि मानवी व्यवहार संस्थेत (IPHB) पाठवलं जाणार आहे.

Image of protesters at the MCG
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटीत खलिस्तान्यांचा राडा, भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर
zomato delivery boy santa claus video news
Zomato Delivery Boy: “हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख…
Image of Husband Arrest.
Domastic Violence : जेवण वाढायला उशीर झाला म्हणून निर्दयी पती जिवावर उठला, पत्नीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
Image of Narendra Modi And Amit Shah
BJP Donation : भाजपा सुसाट… २०२३-२४ मध्ये मिळाल्या २२४४ कोटींच्या देणग्या
pakistan airstrikes in Paktika kill 46 people
‘पाकिस्तानच्या हल्ल्यात ४६ ठार’ ; नागरिकांना लक्ष्य केल्याचा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा दावा
NDA leaders including Amit Shah, Chandrababu Naidu meet at BJP chief's residence
काँग्रेसच्या नकारात्मक विचारांना प्रत्युत्तर देण्याची गरज नाही; अमित शहा यांचा ‘रालोआ’च्या नेत्यांना सल्ला
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Image of police or emergency responders at the scene
Man Sets Himself On Fire : शेजाऱ्यांचे भांडण पोहचले दिल्लीत, उत्तर प्रदेशच्या तरुणाने संसद भवनासमोर घेतले पेटवून

या मुलांचे वडील नजीर खान आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी २४ एप्रिल रोजी मडगाव एक्वेम येथे आले होते. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला. परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस नजीर खान यांच्या घरी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत गेले. पोलिसांनी घरात पाहिलं की अफान खान एका खोलीत मृतवस्थेत पडला होता, तर जुबेर दुसऱ्या खोलीत पडला होता. त्यांची आई अंथरुणावर बेशुद्धावस्थेत पडली होती.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या मुलांचे वडील नजीर खान हे पत्नीबरोबर सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून मडगावमधील दुसऱ्या घरात राहायला गेले होते. उपवास करणं, अनियमितपणे जेवण करणं हे पती-पत्नीच्या भांडणाचं प्रमुख कारण होतं. दरम्यान, नजीरचे भाऊ आणि मृत अफान, जुबेर यांचे काका अकबर खान म्हणाले रुक्साना आणि तिची मुले गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर आले नव्हते. तिघेही बाहेरच्या जगाशी पूर्णपणे विभक्त झाले होते. अकबर खान म्हणाले, नजीरचं घर आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहे. तरीदेखील त्याच्या पत्नी आणि मुलांनी अशा प्रकारण उपवास करणारं आम्हा सर्वांना कोड्यात टाकणारं आहे.

Story img Loader