छत्तीसगडच्या कावर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कुकडूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्ड्यात पडल्याने १५ मजूर ठार झाले आहेत. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पिकअप ट्रकमध्ये तेंदूपत्ता गोळा करून परतत असलेले २५ मजूर होते. ट्रक खड्ड्यात पडल्याने २५ जण खड्ड्यात पडले. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच

हेही वाचा >> भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन; किती येतो खर्च?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कावर्धा, छत्तीसगड येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तर, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “कावर्धा येथे कामगारांनी भरलेलं पिकअप वाहन उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वेदनादायी आहे. या अपघतातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांना विलंब न करता भरपाई द्यावी, अशी मी मागणी सरकारकडे केली आहे.”

Story img Loader