हैदराबादमध्ये एका ३ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी इतकी बेदम मारहाण केली की तिचा रुग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला. या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगी मारहाणीत जखमी झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मंगळवारी (९ ऑगस्ट) उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

३ वर्षीय मुलगी शौचालयातून बाहेर येत नसल्याच्या कारणातून आरोपी वडिलांनी तिला स्वयंपाक घरातील धातूच्या पळीने बेदम मारहाण केली. मुलीच्या आईने आरोपीला मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने आईला फरशीवर ढकलून दिलं आणि मुलीला मारहाण सुरूच ठेवली. अखेर आईने जखमी मुलीला मारहाणीनंतर शनिवारी (६ ऑगस्ट) रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

तक्रारदार महिलेचं आरोपीशी २०१५ मध्ये लग्न झालं. त्यांना चार मुली आहेत. तसेच ही महिला आत्ता ८ महिन्यांची गर्भवती आहे, असंही पोलिसांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा : बालिकेला धमकावून अत्याचाराचा प्रयत्न; पसार आरोपीचा शोध सुरू

आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय बालहक्क कायद्यानुसारही कलमं लावण्यात आली आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.