मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीनं आपल्या सुनेला सुपारी देऊन पत्नीचा काटा काढला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी सासऱ्यासह २५ वर्षीय सुनेला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वाल्मिकी कोळ (वय -५१) आणि कांचन कोळ (वय-२५) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाल्मिकी याला दुसरं लग्न करायचं होतं. पण त्याची पहिली पत्नी सरोज ही अडसर ठरत होती. तसेच मृत सरोज आणि सून कांचन यांच्यात सतत वाद व्हायचा. हीच संधी साधून आरोपी वाल्मिकी कोळ यानं पत्नी सरोज हिची हत्या करण्यासाठी सुनेला ४ हजार रुपयांची सुपारी दिली. तसेच दर महिन्याला ठरावीक रक्कम देण्याचा वादा देखील केला.

36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
old woman died , teen Hat Naka area, Thane,
दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, ठाण्याच्या तीन हात नाका भागातील घटना

त्यानुसार सून कांचन हीने गळा चिरून आपल्या सासूची हत्या केली. १२ जुलै रोजी राहत्या घरात सरोज यांचा मृतदेह आढळला. घटनेच्या दिवशी आरोपी वाल्मिकी सटना येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी गेला होता. तर त्यांचा मुलगा (आरोपी सून कांचनचा पती) कामानिमित्त मेरठला गेला होता. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी सुनेनं आपल्या सासुच्या डोक्यात लोखंडी तव्याने वार केला. या हल्ल्यात सासू सरोज बेशुद्ध झाल्या, त्यानंतर सुनेनं सासऱ्यानं पुरवलेल्या विळ्याच्या सहाय्याने सासूचा गळा चिरला.

हेही वाचा- पुणे : सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी ; सदनिकेतून पाच लाखांचा ऐवज लंपास

ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सासरा वाल्मिकी कोळ आणि सून कांचन कोळ यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader