वडिलांनी स्वत:च्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३० जून रोजी पश्चिम बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात नव्या भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हादेखील दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘जे झालं ते चांगलंच झालं’, विवाहबाह्य संबंधामुळे भररस्त्यात मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी वडील आपली अल्पवयीन मुलगी आणि पत्नीसह दक्षिण २४ परगना जिल्ह्यात राहतो. ३० जून रोजी त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी मुलगी घरात तिच्या खोलीत एकटी होती. यावेळी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी वडिलांनी मुलीच्या खोलीत प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद केला. तसेच त्यांने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी आरोपीची पत्नी घरी दाखल झाली. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत, तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या या तक्रारीनंतर २४ परगना पोलिसांनी आरोपी वडिलांना त्याच्या राहत्या घरून अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वीही अनेक महिलांबरोबर गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलं आहे.

या संदर्भात बोलताना, आम्ही आरोपीला अटक केली आहे. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्याची पत्नी घरी दाखल झाली. त्यानंतर तिने आरोपी पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७६/ ३५१ अंतर्गत तसेच पोस्को कायद्यांच्या कलम १० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण २४ परगना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरक्षकांनी दिली.

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!

दरम्यान, १ जुलै २०२४ पासून देशात भारतीय न्यायसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत कोलकाता येथील विविध पोलीस ठाण्यात ३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे.