Women Raped By In Laws: २००५ मध्ये २८ वर्षीय महिलेवर तिच्या सासरच्या मंडळींनी बलात्कार केल्यावर ग्रामपंचायतीने नंतर तिचा नवराच मुलगा झाला असे ठरवले होते. याच घटनेची आठवण करून देणारी घटना उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये घडल्याचे समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्हा ५ जुलै रोजी, २३ वर्षीय महिलेवर तिच्याच सासऱ्यांनी बलात्कार केला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने माहिती देत सांगितले की, सदर पीडित महिला ही गुन्हा घडतेवेळी सात महिन्यांची गर्भवती होती.

प्राप्त माहितीनुसार, पीडितेच्या ५० वर्षीय सासऱ्याने, कथितपणे घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि या प्रकरणाविषयी तक्रार केल्यास किंवा कोणाकडे तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. ७ सप्टेंबरला पोलिसात तक्रार करत महिलेने म्हटले होते की, “मी माझ्या पतीला मारहाणीची माहिती दिली तेव्हा त्याने मला सांगितले की त्याच्या वडिलांनी माझ्याशी संबंध प्रस्थापित केले असल्याने, आता मी त्याच्या वडिलांची पत्नी बनले आहे म्हणून आम्ही एकत्र राहू शकत नाही”. यानंतर पतीने मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोप तिने केला आहे.

Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले

पीडितेने सांगितले की, “मला माझा मान जपायचा होता म्हणून मी गप्प राहिले पण वारंवार विनंती करूनही, माझ्या पतीने माझी कोणतीही चूक नसताना मला परत घरी घेण्यास नकार दिला. म्हणूनच मी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.”

हे ही वाचा<< धक्कादायक! ‘दोन्ही मुले माझी नाहीत’,असे म्हणत चिमुकल्याला द्यायचा सिगारेटचे चटके

दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती देताना स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) राघवंद्र यादव म्हणाले की, “तिच्या सासऱ्यावर आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) आणि ६०६ (धमकावणे) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पतीवर कलम ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडितेची ओळख तिच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी उघड केलेली नाही. पण सदर प्रकरणात तपास सुरु आहे.

Story img Loader