लाहोरमधील आयएसआयच्या मुख्यालयाबाहेर २००९ मध्ये आत्मघातकी हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांना सहकार्य केल्याच्या आरोपावरून एफबीआयने पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकेतील नागरिकाला अटक केली. या आत्मघातकी हल्ल्यात ३० जण ठार तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.
या नागरिकाचे नाव रियाज कादीर खान (४८) असे असून त्याला पोर्टलॅण्ड, ओरेगॉनमधील त्याच्या घरातून अटक झाली. रियाजने मालदीवच्या अली जलील आणि त्याच्या अन्य साथीदारांना दहशतवादी हल्ल्यासाठी सहकार्य केले होते. या हल्ल्यात जलील ठार झाला. रियाजने ई-मेलवरून जलील याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सल्ला दिला होता. इतकेच नव्हे तर जलील याला मालदीवहून लाहोपर्यंत पोहोचण्यास खानने मदतही केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा