काँग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही असा अहवाल अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने दिला आहे. एफबीआईने त्यांच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे.
सुनंदा यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नेमका कशाने मृत्यू झाला हे स्पष्ट होत नव्हते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांना आज एफबीआयने दिल्ली पोलिसांना ईमेलद्वारे पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे, की सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा किरणोत्सर्गी पदार्थांमुळे (रेडियोअॅक्टिव्ह घटक) झालेला नाही. पुष्कर यांच्या विसेराचे नमुने दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने वॉशिंग्टनमधल्या एफबीआयच्या लॅबला पाठवले होते. विषाबाबत भारतीय प्रयोगशाळांमध्ये नेमके काहीच निष्पन्न होऊ न शकल्याने नमुने परदेशात पाठवले होते. अमेरिकेहून तब्बल 9 महिन्यांनी अहवाल आला आहे.
सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये मृतदेह सापडला होता.
सुनंदा पुष्करांचा मृत्यू रेडियोअॅक्टिव्ह घटकामुळे नाही- एफबीआय
शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
First published on: 11-11-2015 at 11:04 IST
TOPICSसुनंदा पुष्कर
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fbi lab report rules out radiation poisoning in sunanda pushkars case