एफबीआय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारी सहा गोपनीय कागदपत्रं तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत. डेलावेयर येथील विल्मिंग्टन स्थित बायडेन यांच्या घरावर एफबीआयने छापेमारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे १३ तास झाडाझडती घेतल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बायडेन यांच्या घरातून सहा गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये लिखित स्वरुपातील काही कागदपत्रं असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रध्यक्ष बायडेन यांचे वकील बॉब बाऊर यांनी शनिवारी सांगितले की, “न्याय विभागाने शुक्रवारी बायडेन यांच्या विल्मिंग्टन निवासस्थानाची झडती घेतली. सुमारे १३ तास शोधाशोध सुरू होती.

हेही वाचा- बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषण करू दिलं नाही? भरसभेत नकार दिलेला ‘तो’ VIDEO व्हायरल

बाऊर यांनी एका निवेदनात म्हटलं की, तपास यंत्रणांनी काही ऐवज ताब्यात घेतल आहे. ज्यामध्ये गोपनीय चिन्हांकित कागदपत्रे आणि इतर सामग्री समाविष्ट आहे.” यातील काही कागदपत्रं बायडेन सिनेट सदस्य आणि उप राष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळातील आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fbi raid at american president joe biden house seized 6 secret documents rmm
Show comments