किरकोळ व्यापारातील थेट परकीय गुंतवणूक शेतकऱ्यांच्या आणि देशभरातील ग्राहकांच्या फायद्याचीच असल्याचा सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र शासनाने घेतलेल्या एफडीआयच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आह़े तसेच एफडीआयचा छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांवर विपरीत परिणाम होईल, ही भीतीही निराधार असल्याचे ते येथे म्हणाल़े
पंजाब कृषी विद्यापीठाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषी विज्ञान केंद्र – २०१२’ या सातव्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े पंजाबमध्ये भात-गहू या धान्यांच्या आलटून- पालटून पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, जमिनीचा कस कमी करणारा आणि भूजलाचाही ऱ्हास करणारा असल्याचेही त्यांनी उपस्थितांना बजावल़े तसेच पिके घेण्याची ही पद्धत बदलण्यासाठी पंजाब शासनाशी तसेच व्यक्तिश: पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी पुढे सांगितल़े
पंजाब शासनाने तेलबिया आणि कडधान्यांची पिके घेण्यावरही भर घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला़ उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड आदी राज्यांमध्ये भातशेतीला प्रोत्साहन देऊन दुसरी हरित क्रांती आणण्यावर केंद्र शासनाचा भर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली़
एफडीआय शेतकऱ्यांच्याच फायद्याचे,शरद पवार यांचा दावा
किरकोळ व्यापारातील थेट परकीय गुंतवणूक शेतकऱ्यांच्या आणि देशभरातील ग्राहकांच्या फायद्याचीच असल्याचा सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र शासनाने घेतलेल्या एफडीआयच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आह़े
First published on: 21-11-2012 at 04:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fdi is profitable to farmers